रेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला केली मारहाण

रेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कोपर रेल्वे स्थानकात घडली. या मारहाणीत मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता जखमी झाले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2017, 06:46 PM IST
रेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला केली मारहाण  title=

ठाणे : रेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कोपर रेल्वे स्थानकात घडली. या मारहाणीत मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता जखमी झाले आहेत. 

सतीश जोसेफ असं मारहाण करणा-या कर्मचा-याचं नाव असून या प्रकारानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केलीये. शिवाय त्याला निलंबितही करण्यात आले आहे. सोमवारी रात्री गुप्ता हे कोपर स्थानकाची अचानक पाहाणी करण्यासाठी गेले असता बुकिंग ऑफिसमध्ये बुकिंग क्लार्क सतीश जोसेफ ऐवजी भलताच माणूस तिकीट देण्यासाठी बसलेला आढळला.

शिवाय आणखी एक अनोळखी व्यक्ती यावेळी आतमध्ये उपस्थित होता. याबाबत विचारणा केल्यावर हे दोघे आपले मित्र असल्याचे जोसेफने सांगितलं. मात्र अशाप्रकारे बाहेरील व्यक्तीला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये प्रवेश नसल्याने गुप्ता यांनी या दोघांनाही बाहेर काढले. 

याचा जोसेफला राग आल्याने त्याने गुप्ता यांना मारहाण केली. यात गुप्ता यांच्या डोळ्याला इजा झाली असून यानंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवत जोसेफला बेड्या ठोकल्या आहेत.