नाशिक : मनसेचं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा पार पडली. अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या या सभेसाठीही नाशिककरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
- आमची बँक विकासाची... शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बँका दिवाळखोरीत
- शिवसेना ही लेना बँक, देना बँक नाही - मुख्यमंत्री
- 'कृष्णकुंज' हीच राज ठाकरेंची एकमेव शाखा बाकी मनसेची कुठेही शाखा नाही - मुख्यमंत्री
- 'राज यांच्याकडे निवडणुकीनंतर फक्त नकला करण्याचं काम' आता गणेशोत्सवात त्यांचे कार्यक्रम ठेवावे लागतील - मुख्यमंत्री
- मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधुंवर टीका
- योग्यवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू
- नाशिककर मनसेला शहराबाहेर घालवणार... मनसेच्या भूलथापांना बळी पडू नका
- कुंभमेळ्याचं सर्व नियोजन आमचं, पैसा सरकारनं दिला... नाशिक महापालिकेकडे पैसा नसल्याचं राज ठाकरेंनी फोन करून सांगितलं - फडणवीस
- रतन टाटांना बोलावून बोटॅनिकल गार्डन केलं... पण मूलभूत सुविधांचं काय?
- राज ठाकरे कल्पक आहेत... पण कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात
- नाशिककर एकदा नकलेला भुलले, सारखे सारखे भुलणार नाहीत
- नाशिकमध्ये रोजगार उत्पन्न करणार... विमानतळावर वाहतूक लवकरच सुरू होणार
- महिंद्रा अॅन्ड महिंद्रा नाशिकमध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
- रामदेव बाबांनी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केलीय
- आजपासून माझं दत्तक गावं नाशिक असेल... पाच वर्षांत नाशिकचा विकास घडवून दाखवीन... नाहीतर पाच वर्षानंतर तोंड दाखवायला येणार नाही
- लोक म्हणतात मी नागपूरचा आहे... मी म्हणतो, नागपूरसाठी आमचे गडकरी साहेब पुरेसे आहेत, ते नागपूरच्या विकासाचं पाहून घेतील - मुख्यमंत्री
- मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मला सत्ता द्या - मुख्यमंत्री