नागपूर : विधानसभेत आज स्मार्ट सिटीचा मुद्दा गाजला. स्मार्ट सिटी योजनेला वाढता विरोध मुख्यमंत्र्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
स्मार्ट सिटी योजनेबाबत असलेले आक्षेप आणि त्रुटी दूर करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच महापालिकेचे सर्व अधिकार अबाधित राहतील असं आश्वासनही त्यांनी विधानसभेत दिलं. तर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मुंबईसारख्या शहरांना 100 कोटींचा निधी अतिशय तुटपुंजा असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.
तर महापालिकेच्या पदाधिका-यांचा एसपीव्हीत समावेश करणार की नाही या शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना सदस्य नेमण्याचे अधिकार महापालिकेलाच असतील असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.