मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.सकाळी अकराच्या सुमाराला ते लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील. 

Updated: Dec 10, 2016, 08:25 AM IST
मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर title=

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.सकाळी अकराच्या सुमाराला ते लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील. 

त्यानंतर तळेगाव दाभाडे, आळंदी, शिरूर आणि बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील. १० डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३५ वाजता नागपूर येथून विमानाने पुणे विमानतळावर आगमन होईल. ११ वाजता पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मौजे ठोंबरेवाडी, टाटा डॅम, लोणावळा, ता. मावळ येथे आगमन आणि ११.१५ वाजता लोणावळा नगर परिषद निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती.

दुपारी १२.३० वाजता हेलिकॉप्टरने तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे आगमन आणि १२.४५ वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती लावतील. दुपारी २.१५ वाजता तळेगाव दाभाडे येथून हेलिकॉप्टरने आळंदी. ता. खेड येथे आगमन आणि त्यानंतर आळंदी नगर परिषद निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती असेल.

दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी आळंदी हेलीपॅड येथून हेलिकॉप्टरने सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे आगमन आणि शिरूर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती. ४.३५ वाजता शिरूर येथून हेलिकॉप्टरने बारामतीकडे प्रयाण करतील. 

सायंकाळी ५.०० वाजता बारामती येथे आगमन व ५.१५ वाजता बारामती नगर परिषद निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती लावतील.