मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Updated: Dec 14, 2014, 10:37 AM IST
मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर title=

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

दिंडोरी, चांदवड, आणि निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. 

गारपीटग्रस्तांना मदत होण्यासाठी पंचनामे योग्य पद्धतीनं होण्याची गरज असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरेंनी वेधशाळांच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

जळगाव शहर अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल, पारोळा तसंच यावल तालुक्यातील केळी पट्ट्यात या पावसानं थैमान घातलं. फैजपूर परिसरात केळीच्या बागा चक्रीवादळामुळं जमीनदोस्त झाल्या. अन्य तालुक्यांतही हा नुकसानीचा पाऊस झाला. पारोळा तालुक्यात भोलाणे गावात वादळात सापडल्यानं झाडाचा मार बसून मंजाबाई पाटील या महिलेच्या मृत्यू झालाय. 

दोन दिवस झालेल्या या अवकाळी पावसामुळे केळी, पपई, कापूस, कांदा, डाळिंब, द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. काही घरांचे पत्रे उडाल्यानं घरांची पडझड झालीय. शासनानं मदत केल्यावरही शेतकऱ्यांचं न भरून निघणारं नुकसान या अवकाळी पावसामुळं झालय.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.