राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे. 

Updated: Aug 25, 2016, 11:04 PM IST
राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार title=

मुंबई : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे. 

याअंतर्गत आज अनेक बड्या उद्योजकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला रतन टाटा, बिर्ला, महिंद्रा या बैठकीला उपस्थित होते. सुपरस्टार अमिताभ बच्चनही या बैठकीला हजर होते. 

जल, जमीन, जंगल याबाबात शास्त्रीय आढावा घेतला जाईल आणि त्या अनुषंगानं विकास केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर बिग बीनं आपली स्कील आणि चेहरा याचा या योजनेसाठी पुरेपुर वापर करीन, असं आश्वासन दिलं. कॉर्पोरेट जगतानंही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.