राज्यात थंडीचा कडाका वाढला

नाशिक जिल्ह्यातील थंडीने पुन्हा जोर पकडला असून तापमानाचा घटणारा पारा आता ४.४ अंश सेल्सियसवर पोहोचलाय. या हंगामातली ही नीच्चांकी तापमानाची नोंद आहे.

Updated: Jan 23, 2016, 09:42 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढला title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील थंडीने पुन्हा जोर पकडला असून तापमानाचा घटणारा पारा आता ४.४ अंश सेल्सियसवर पोहोचलाय. या हंगामातली ही नीच्चांकी तापमानाची नोंद आहे.

गेल्या काही आठवड्यात थंडी गायब झाली होती. पण पुन्हा दररोज तापमान कमी होत चालले असून शुक्रवारी मात्र ते चांगलेच कमी झाले. थंडीने जनावरही गारठली आणि दुध उत्पादनावर परिणाम झालाय. ठिकठिकाणी शेकोट्याही पेटलेल्या दिसतायत.

नागपुरातही पारा ५.१ अंशांपर्यंत खाली घसरलाय. गेल्या १० वर्षातला सर्वात कमी तापमान शहरात नोंदलं गेलंय. गेल्या १० वर्षात सर्वात कमी तापमान या आधी ९ जानेवारी २०१३ ला ५.६ अंश होते. आजवरचे सर्वात कमी ३.९ अंश तापमान ७ जानेवारी १९३७ ला होते. आज गेल्या 10 वर्षातला सर्वात थंड दिवस आहे.