सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळलीय. नितेश राणे यांनी लोकसभेतील पराभवाला नेते आणि पदाधिका-यांच्या ठेकेदारीला जबाबदार धरलंय.
काँग्रेसमध्ये 'दुकान' मांडणा-यांची डाळ शिजू देणार नाही तसंच नारायण राणें यांच्यासोबत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची ताकद लावणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
तर काँग्रेस अध्यक्ष आणि नारायण राणे यांच्याशिवाय कुणालाही बोलण्याचा अधिकार नसल्याचं, माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
यामुंळ आता राणे समर्थकांमधल्या जुन्या आणि नव्या पिढीचा वाद समोर आलाय. यात नारायण राणे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.