मराठवाड्यात जेमतेम 22 टक्के पाऊस

 यंदा जुलै उजाडला तरी मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 22 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे या परिस्थितीत डोळे आभाळाकडे लागले असले तरी नियोजनातील गंभीर चुकासुद्धा दुष्काळाला हातभारच लावत असल्याचं चित्र आहे. आकडेवारी पाहिली तर राज्यात मराठवाडा प्रकल्पांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे तरीही दुष्काळ पाजवीला पुजलेला आहे.

Updated: Jul 3, 2014, 03:59 PM IST
मराठवाड्यात जेमतेम 22 टक्के पाऊस title=

औरंगाबाद : यंदा जुलै उजाडला तरी मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 22 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे या परिस्थितीत डोळे आभाळाकडे लागले असले तरी नियोजनातील गंभीर चुकासुद्धा दुष्काळाला हातभारच लावत असल्याचं चित्र आहे. आकडेवारी पाहिली तर राज्यात मराठवाडा प्रकल्पांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे तरीही दुष्काळ पाजवीला पुजलेला आहे.

या 828 प्रकल्पांमध्ये जेमतेम 20 टक्के पाणीसाठा आहे.. पाऊस कमी पडला असला तरी पडलेलं पाणी जमा करून ठेवण्यात मराठवाडा कमी पडलाय यात वाद नाही... धरण बांधा आणि विसरा या तत्वावर हे प्रकल्प बांधण्यात आल्याचं तज्ज्ञ सांगताय. धऱणाच्या बांधकामात सुसुत्रता नाही, पाण्याचा प्रवाह कसा त्यातून नुकताच शासनाने मराठवाड्यातील धऱणांचा अभ्यास केला तेव्हा यातील बहुतांश धऱणं फक्त पाझर, आणि पाणीचोरीसाठीच वापरण्याच्या लायकीच असल्याचं समोर आल्याचं तज्ज्ञ सांगताय.

तसा विचार केला तर मराठवाड्यात पाऊस नेहमीच लहरी राहिलाय.. मराठवाड्यात सरासरी वार्षिक पाऊस 779 मीमी इतका पडतो. मात्र गेल्या 8 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे चित्र फारसे समाधानकारक नाहीच. पावसाच्या या लहरीपणामुळं पाणी खूप जपून वापरायला हवं मात्र तसं होताना दिसत नसल्याचं दुर्देवी चित्र आहे उपलब्ध पाण्याचा वापर नियोजनातून होत नसल्यानं वारंवार पाणीटंचाईला सामोर जावं लागतं.. त्यात कहर म्हणजे दुष्काळी मराठवाड्यात उसाचं मोठ्या प्रमाणात पिक घेतल्या जातय.. खर तर उसाला भरपूर पाणी लागतं मात्र पाण्याच्या उपलब्धतेचा विचार न करता नगदी पिक म्हणून उसाचं पिक घेण्याच प्रमाण वाढल्यानं सुद्धा पाण्याची नासाडी होत असल्याचं तज्ज्ञ सांगताय.

सततच्या पाणी उपश्यामुळं भूगर्भातील पाणीपातळी सुद्धा कित्येक तालुक्यात आता 2 मीटरच्या खाली गेली आहे... त्यामुळं भविष्यात पाऊस जास्त पडणार असं कुणीही छाती ठोकून सांगू शकत नाही त्यामुळं पडणा-या पावसांच योग्य नियोजनच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे धरणांचं संगोपण, सुसुत्रता आणि पिकांच्या पद्धती बदलल्याशिवाय दुष्काळावर मात करणं शक्य होणार नाही हेच सत्य आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.