काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी आणखी 5 जणांना अटक

भिवंडीमधील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2017, 05:32 PM IST
काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी आणखी 5 जणांना अटक title=

ठाणे : भिवंडीमधील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. आणखी पाच जणांना काल पोलिसांनी अटक केली.

भिवंडीमधील म्हात्रे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली होती त्यानंतर त्यांची हत्या करणारे आरोपी फरार झाले होते. 

या प्रकरणी १४ पैकी ९ आरोपीना पोलिसांनी या पूर्वी अटक केल्यानंतर काल ५ आरोपीना अटक केली आहे. यामध्ये हत्येचा सूत्रधार प्रशांत म्हात्रे याचा समावेश होता. तसेच यातील आरोपी चिरंजीव तथा मोटू  बळीराम म्हात्रे हा मनोज म्हात्रे हल्ल्यात सहभागी होता. या पाचही आरोपीना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे 

मनोज म्हात्रे यांच्या हत्येत प्रमुख आरोपी असलेला प्रशांत म्हात्रे याला पाचगणी येथून अटक केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. राजकीय वैमनस्येतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. मनोज म्हत्रे यांची हत्या १४ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांच्या इमारतीच्या खाली भिवंडीत हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी या १४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तर पोलिसांनी २१ पेक्षा अधिक जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तब्बल १५ वर्ष नगरसेवक म्हणून राजकारणात वावरणाऱ्या वडिलांनी मनोज याला निवडणूक रिंगणात उतरविले. मनोजमुळे आपल्या राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर असल्याने मनोज म्हात्रे यांची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.