नवी मुंबई : पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
नवी मुंबईत गेल्या २० वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला प्रथमच हादरा बसला आहे. कारण नाईक यांना स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे नवी मुंबईत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार असली तरी काँग्रेसला बरोबर घ्यायला तयार झाली आहे. त्यामुळे प्रथमच नवी मुंबईत काँग्रेसला सत्तेचा दार उघडे झाले आहे.
दरम्यान, गणेश नाईक यांनी काँग्रेसला आवाहन करताना अपक्ष संपर्कात आहेत. त्यामुळं सत्ता स्थापण्याची चिंता नाही. काँग्रेस सोबत आली तर काँग्रेसला सोबत घेवून सत्ता स्थापन करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे गणेश नाईकांचे आवाहन काँग्रेस स्वीकारण का, याची उत्सुकता आहे.
नवी मुंबईची जबाबदार काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावर होती. मात्र, त्यांचा करिष्मा दिसून आला नाही. तसेच गणेश नाईक गटाला उखडून टाण्यासाठी शिवसेनेने मतदारांना आवाहन केले होते. शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली तरी नाईक यांचे वर्चस्व कमी करता आलेले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.