भिवंडीत काँग्रेस नेत्याची क्रूर हत्या

भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलीय. 

Updated: Feb 15, 2017, 12:20 AM IST
भिवंडीत काँग्रेस नेत्याची क्रूर हत्या title=

ठाणे : भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलीय. 

भिवंडी मनपा सभागृह नेते आणि जेष्ठ काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केला... या गोळीबारात त्यांच्या हाताला गोळी लागली. इतकचं नाही तर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानंही वार करून गंभीर जखमी केलं.

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहेत.