चंद्रपूर जिल्ह्यात वृध्द डॉक्टरची पत्नीसह हत्या, दरोड्याचा संशय

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या गावात एका वृध्द डॉक्टरची त्यांच्या पत्नीसह हत्या झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटना ३१ ऑगस्ट घडली असून आज सकाळी उजेडात आली. 

Updated: Sep 1, 2015, 04:56 PM IST
चंद्रपूर जिल्ह्यात वृध्द डॉक्टरची पत्नीसह हत्या, दरोड्याचा संशय   title=

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या गावात एका वृध्द डॉक्टरची त्यांच्या पत्नीसह हत्या झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटना ३१ ऑगस्ट घडली असून आज सकाळी उजेडात आली. 

आणखी वाचा - 'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

६५ वर्षीय डॉ. देवराव जोगी आणि त्यांची पत्नी सुधा यांचे मृतदेह सकाळी त्यांच्या राहत्या आढळून आले. डॉ. जोगी रजिस्टर्ड मेडिकल व्यावसायिक होते. ते सावकारीचा व्यवसाय देखील करत होते. 

आणखी वाचा - पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक

दोघांच्या डोक्यावर जबर प्रहार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पोचले आहेत. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हा दरोड्याचा बनाव आणि सावकारीच्या व्यवसायातील वाद असल्याचंही बोललं जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.