कोण आहेत केडीएमसीत १० गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक

कल्याण डोंबविलीत 120 जागांचे निकाल लागले, त्यात अनेक जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण असे काही नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हाची नोंद आहे पण तरीही ते कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरविणार आहेत.  

Updated: Nov 3, 2015, 04:14 PM IST
कोण आहेत केडीएमसीत १० गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक title=

कल्याण : कल्याण डोंबविलीत 120 जागांचे निकाल लागले, त्यात अनेक जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण असे काही नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हाची नोंद आहे पण तरीही ते कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरविणार आहेत.  

यात भाजपचे सर्वाधिक सहा नगरसेवक आहेत. त्यानंतर शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. 

झी 24 तासने या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नगरसेवकाच्या प्रोफाइलवर टाकलेली ही नजर... 

प्रभाग ४३ नेतिवली - नवीन गवळी (शिवसेना), फसवणूकीचा गुन्हा आहे, सर्वात महागड्या गाड्या दिमतिला असतात तर, घोडे लावलेले गुंड २४ तास सोबत असतात.

प्रभाग ४६ खंबाळपाडा - शिवाजी शेलार, बिनविरोध (भाजप), - एकही गुन्हा नाही पण, ठाणे जिल्ह्यातील कुप्रसिद्ध केएमसी गॅंगचा मोहरक्या होता. आणि आजही खंबाळपाडा शैलार नाका भागात दहशत आहे.

प्रभाग ५० गरीबाचा पाडा - विकास म्हात्रे (भाजप) - २ गुन्हे खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबर मारहाण करणे, खंडणी मागणे, धमकावणे, घातक शस्त्रांसह दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे. सतत कोणत्या ना कोणत्या वादात असणारा हा नगरसेवक असून, दहशत माजवणे आणि कमरेला घोडा लावलेल्या गुंडांना बरोबर घेवून फिरणे यात विकास म्हात्रे आघाडीवर असतो.

प्रभाग ६५ कोपर रोड - रमेश म्हात्रे (शिवसेना) - खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबर मारहाण करणे, खंडणी मागणे, धमकावणे, घातक शस्त्रांसह दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, जमिन बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे रमेश म्हात्रेवर दाखल आहेत. शिवाय एकेकाळी रेल्वेत चालणा-या पाकिटमारीचा मोहरक्या असल्याचे बोलले जाते. कल्याण पश्चिमेत तुफान दहशत आहे रमेश म्हात्रेची.  राजकीय नेत्यांनी स्वत: सोबत हत्यार बंद गुंड घेवून फिरवण्याची परंपरा डोंबिवली मध्ये रमेश म्हात्रे ने सुरु केली. गॅंगवार मध्ये दोनदा रमेश म्हात्रेवर गोळीबार झालाय. तर सेनेचा बाहुबली नेता म्हणुन रमेश म्हात्रे ओळखला जातो.

प्रभाग ८२ अंबिकानगर - महेश पाटील (भाजप)- खून, खूनाचा प्रयत्न, कट रचने, धमकावणे, बेकायदेशीर शस्त्रांच्या साह्याने दंगल माजवणे, खंडणी मागणे, मारहाण करने, सरकारी कर्मचा-याला मारहाण करने, तडीपारी, दरोडा घालणे. या सारखे गंभीर गुन्हे आहेत महेश पाटीलवर, शिवाय फिरताना सतत ३०-४० गुंड घेवून फिरणे कमरेला सतत घोडा असतो.

प्रभाग ८४ आजदे - विनोद काळन (भाजप) - घातक शस्त्राने दुखापत करणे, आजदे येथे एका भाजप आमदाराच्या वरदहस्ताने बेकायदेशीर बांधकामांना अभय देण्याचे काम विनोद काळण करतो.

प्रभाग ८८ संतोष नगर - महेश गायकवाड (शिवसेना),

प्रभाग १०३ कैलास नगर - मनोज राय (भाजप),

प्रभाग १०७ पिसवली - मोरेश्वर भोईर (भाजप)- खून, खूनाचा प्रयत्न, कट रचने, धमकावणे आणि दंगल माजवणे. कमरेला सतत घोडा असतो. सरकारी जमीन बळकावून त्यावर अनधिकृत इमारती बांधण्यासाठी मदत करणे अशी प्रतिमा या विजय उमेदवाराची आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.