तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामध्ये भुकेमुळे पस्तीस वर्षांच्या ललिता रंगारी या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.
ही महिला आपल्या अंध तसंच अपंग मुलासह तिरोडा इथल्या जगजीवन राम वॉर्डात राहत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती आजारी असल्यामुळे, घरातच राहत होती.
या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुद्धा केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.