मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईच्या पाटणकर दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलींना शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश मिळत नसल्याची तक्रार मांडली होती. त्यावर निर्णय देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या शाळा या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवेश देत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
पाटणकर दाम्पत्याच्या मुलींना या कायद्यातील निकषानुसार शाळेत प्रवेश मिळण्यासंदर्भात शिक्षण विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.
त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्यी पायमल्ली करुन प्रवेश देणाऱ्या शाळांवर जरब बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच मनमानी कारभार करणाऱ्या शाळा चालवणाऱ्यांना जरबही बसणार आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधत राज्यात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकशाही दिनाचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांशी शाळा प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.