नागपूर : विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष रहिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जाहीर केले. आणि गेल्या दिवसांपासून सुरु असलेला गोंधळ सुपुष्टात आला.
मात्र विरोधकांची धार कमी करण्याची भाजपची खेळी केल्याचं बोललं जातंय. कालच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी विरोधी पक्षनेतेपदी मुंडे यांच्या नावाची घोषणा करीत पंधरा दिवसांपासून याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. मुंडे परिषदेतील विसावे विरोधी पक्षनेते ठरले. मुख्यमंत्र्यांसह सभागृहातील गटनेते, प्रमुख सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तर विखे पाटील यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना गटनेते व मंत्री एकना शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठतम नेते गणपतराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादीतर्फे या पदासाठी आर. आर. पाटील यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी यांनी विखे पाटील यांचेच नाव निश्चित केले. या घोषणेनंतर विधानसभेमधील सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सदस्यांनीही विखे पाटील यांच्या नावास बाक वाजवून सहमती दर्शविली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.