बीड : राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ जागांवर भाजपचे आणि सेना, काँग्रेसचे एक-एक उमेदवार आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी याठिकाणी जोरदार प्रचार केला होता. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे धनंजय मुंडे या बहीण-भावांमधील चुरशीमुळे परळीची नगरपालिकेची निवडणूक रंगतदार बनली होती. दोघांनी स्वत:ची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मुंडे विरुद्ध मुंडे अशीच ही लढाई होती. धनंजय मुंडे यांनी या लढाईत बाजी मारल्याचं दिसत आहे.