या जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.

Updated: Feb 15, 2017, 07:07 PM IST
या जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान title=

नवी दिल्ली : राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.

25 पैंकी 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान घेण्यात येणार आहे. एकूण 2 हजार 567 जागांसाठी 11 हजार 989 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहेत.

मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी नवी दिल्ली इथे दिलीय.

नेमकं कुठे कुठे मतदान होणार आहे पाहुयात...

- जळगाव

- अहमदनगर

- बुलडाणा

- यवतमाळ

- औरंगाबाद

- जालना

- परभणी

- हिंगोली

- बीड

- नांदेड

- उस्मानाबाद

- लातूर

- वर्धा

- चंद्रपूर

- गडचिरोली