नागपूर: सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी.... तुमचा अकाऊंट नंबर चुकून कुणालाही सांगण्याचा गाफीलपणा केलात, तर काही सेकंदात तुमचं अख्खंच्या अख्खं अकाऊंट रिकामा होऊ शकतं. विशेष म्हणजे बँकेतून बोलत असल्याचे खोटे फोन करुनच कोट्यवधींचा गंडा घातला जातोय.
आम्ही या सगळ्या सूचना तुम्हाला वारंवार देतोय.... कारण नागरिकांना उल्लू बनवून त्यांच्य़ा अकाऊंटमधले पैसे काही सेकंदात लंपास करणाऱ्या टोळीनं नागपुरात हैदोस घातलाय.
ही टोळी बँकेच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातून बोलत असल्याचा खोटा फोन करायची.
तुमच्या ATM कार्डाची वैधता विचारण्यासाठी डेबिट किंवा एटीएमचा पिन मागायचे... क्रमांक दिला नाही तर खातं बंद करण्याची धमकी द्यायचे. खात्यासंबंधी माहिती मिळाल्यावर ही टोळी त्यातली रक्कम विविध खात्यात वळती करायची. ही रक्कम वापरुन विविध वस्तू खरेदी खरायचे आणि पुन्हा याच वस्तू OLXवर विकून त्यातूनही पैसे कमवायचे.
नागपूरमध्ये अशा प्रकारे या टोळीनं अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातला. अखेर नागपूर पोलिसांनी त्यांचा माग काढला आणि झारखंडमधल्या जामतारा गावातून आस्तिक कुमार, रोहित मंडल आणि रामदेव मंडल या ३ आरोपींना अटक केली. या टोळीनं आसाम आणि झारखंडमधल्याही अनेक खातेदारांना गंडा घातल्याचं समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.