हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन

ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Updated: Mar 30, 2017, 10:07 PM IST
हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन  title=

उल्हासनगर : राज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. काल जळगाव आणि ठाण्यात डॉक्टरांवर हल्ले झाले, त्याचा निषेध करण्यासाठी उल्हासनगरमधल्या मध्यवर्ती रूग्णालयातील डॉक्टरांनी हेल्मेट घाऊन आंदोलन केलं. दिवसभर हे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हेल्मेट घालून होते.

दरम्यान ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.

उपचारामध्ये दिरंगाई केल्याचा आरोप करत ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी डॉक्टरांवर चॉपरनं हल्ला केला आणि हॉस्पिटलची तोडफोड केली होती.