नाशिक : उपचाराअभावी आज सकाळीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूची भयानक साथ पसरलीय. तरीही नाशिकमधल्या खासगी डॉक्टर्सनी संप केलाय.
धक्कादायक म्हणजे तिथली अत्यावश्यक सेवा ही डॉक्टरांनी बंद ठेवलीय. कुणीही आजारी व्यक्ती खासगी रुग्णालयात गेली तर सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, असं उत्तर देण्यात येते आहे.
सरकारी हॉस्पिटलमधले डॉक्टरही संपावर आहेत. तिथेही कुणी दाद देत नाहीय. स्वाईन फ्लूची साथ वाढली असताना, रुग्णांचे मृत्यू होत असताना डॉक्टर मात्र त्यांच्या ताठर भूमिकेवर कायम आहेत.