नाशिक : नाशिकमधील प्रतिष्ठित गंगापूर रोड भागात हुंडाबळीची घटना उजेडात आली आहे. स्वाती पाटील नावाच्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय.
गेल्या वर्षी लग्न झालेल्या स्वातीच्या वडिलांकडं तीन लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे न दिल्यानंच सासरे निवृत्ती पाटील आणि पती पियुष पाटील यांनी स्वातीचा जीव घेतल्याचा आरोप स्वातीच्या नातेवाईकांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील मूळच्या एरंडोलच्या स्वातीनं आत्महत्या केल्याचा बनाव आता पाटील कुटुंबीय करत असल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
लग्नात दिलेले दागिने आणि हुंड्यात दिलेले आठ लाख रुपयेही परत मिळावे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येते आहे. विशेष म्हणजे या महिलेचे सासरे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते असून मोठ्या पदावर काम करतात. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी कुजबूज नाशिकमध्ये सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.