नागपूर : दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत देण्यात यावी. तसेच पीक कर्ज, वीज बिल माफ करा. आत्महत्याग्रस्तांच्या विधवांना पेन्शन द्या आदी मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या. दुष्काळाच्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची विधानसभेत ही मागणी केली.
विधानसभेतील दुष्काळावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी १० हजार कोटींच्या मदतीची मागणी केलीय. तसंच दुष्काळग्रस्त शेतक-यांचे पीक कर्ज आणि वीज बिल माफ करण्याचीही मागणी पवारांनी केलीय.
तसंच आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवांना एक हजार रुपये पेन्शन आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केलीय़. स्थगन प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी ही मागणी केलीय. तत्पूर्वी दुष्काळाची स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची विरोधकांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.