परभणी : जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.
काही शेतकऱ्यांना ही मगर शेतात दिसत होती, जेव्हा एका शेतकऱ्याने मगरीचे फोटो काढून आणले आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवले, तेव्हा ते खळबळून जागे झाले.
शेतकऱ्यांनी आणि वनखात्याने या मगरीला अखेरीस पाच तासानंतर दोरखंडात बांधलं आणि औरंगाबादला रवाना केलं. नद्यांमध्ये पाणीच नसल्याने ही मगर नदीबाहेर येऊन शेतात फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे, प्राण्यांना दुष्काळामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.