जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड

लाखो रुपयांची रोकड, किमती दागीने वस्तू चोरल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतो, जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2017, 11:07 AM IST
जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड title=

जळगाव : लाखो रुपयांची रोकड, किमती दागीने वस्तू चोरल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतो, जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

इथं चोरांनी पैसे, दागिन्यांवर नव्हे तर चक्क कचऱ्यावर आपला हात साफ केला आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील महापालिकेचा कचराच चोरीला गेला आहे. या कचरा चोरीप्रकरणी मुख्याधिकारी यांनी गुन्हा दाखल केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

वास्तविक अनेक शहरांमध्ये कचरा टाकण्यास जागा नसते, अनेकांचा डम्पिंग ग्राऊंडलाच विरोध असतो, मात्र येथे नेमका कचरा चोरला जात आहे, कचरा चोर हा कचरा नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरतोय, हे अजून समजू शकलेले नाही.