ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण  सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 6, 2017, 06:44 PM IST
 ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण  सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे. 

- केंद्रीय निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाला विशेष परवानगी दिली आहे.  उद्या उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं कल्याण मध्ये होणार लोकार्पण सोहळा होणार आहे. 

मात्र आजच्या ठाण्यातील उद्घाटन कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने ही परवानगी  उद्धव ठाकरेंच्या हस्ते परिवहन विभागाच्या रिक्षा लोकार्पण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या मुंबईत रिक्षा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. 

आज उद्धव ठाकरे ठाण्यात कार्यकर्त्यांची फक्त भेट घेणार आणि फेरफटका मारणार आहे.