शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान, शरद जोशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Updated: Dec 12, 2015, 02:26 PM IST
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन title=

पुणे : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान, शरद जोशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८०च्या दशकात शेकापची राजकीय ताकद खालावली होती. त्यावेळी शरद जोशींनी शेतकऱ्यांची पूर्णपणे बिगर-राजकीय चळवळ बांधायला सुरुवात केली.

शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. 

जोशी यांनी शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र 'साप्ताहिक वारकरी’चे संपादक व प्रमुख लेखक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे झाली आहेत.

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
- शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
- प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
- चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
- शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
- स्वातंत्र्य का नासले?
- खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
- अंगारमळा
- जग बदलणारी पुस्तके
- अन्वयार्थ -१,२
- माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
- बळीचे राज्य येणार आहे
- अर्थ तो सांगतो पुन्हा
- पोशिंद्याची लोकशाही
- भारतासाठी
- राष्ट्रीय कृषिनीती

हिंदी ग्रंथसंपदा
- समस्याए भारत की
- स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

इंग्रजी ग्रंथसंपदा
- Answering before God
- The Women‘s Question
- Bharat Eye view
- Bharat Speaks Out
- Down To Earth

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.