भोर, पुणे : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे, असा दावा आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे.
अनंतराव थोपटे हे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत. आरोप केलेल्या महिला आणि तनपुरे नावाच्या काही लोकांनी माझ्या आईला कोंडून ठेवले होते, असा गंभीर आरोप थोपटे यांनी केला आहे.
आईला सोडवायला गेलेल्या गाडीवर तनपुरे यांनी दगडफेक केली तसेच, ड्रायव्हरला देखील मारहाण केली. हा प्रकार समजल्यानंतर अनंतराव थोपटे तेथे गेले. रागाच्या भारात त्यांनी काही अपशब्द वापरले. त्याबद्दल संग्राम थोपटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
आरोप करणाऱ्या महिलांवर याआधी देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल आहे, असेही थोपटे यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.