कैलास पुरी, पुणे : कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.
आळंदीमधली अपेक्षा पांचाळ. चारचौघींसारखीच. मात्र, अपेक्षाला अनपेक्षितपणे रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळालीय. सोलापूरमध्ये एका चित्रपटाचं चित्रिकरण पाहायला ती गेली होती. तिथे दिग्दर्शकाची नजर अपेक्षावर पडली आणि त्यांनी तिला थेट एका तमिळ चित्रपटातच काम करण्याची संधी दिली. लवकरच तिचा हा टॉलीवूड चित्रपट रिलीज होतोय. तिला आता मराठी चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या आहेत.
आळंदी ते सोलापूर. आणि तिथून तमिळ चित्रपटसृष्टी ते मराठी चित्रपटसृष्टी असा तिचा प्रवास सुरु झाला आहे. अपेक्षा न बाळगताही तिनं संधीला शोधण्याऐवजी, संधीनंच तिला गाठलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.