ऐतिहासिक : शनी शिंगणापूर देवस्थानावर अध्यक्षपदी महिलेची निवड

शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली.

Updated: Jan 11, 2016, 02:32 PM IST
ऐतिहासिक : शनी शिंगणापूर देवस्थानावर अध्यक्षपदी महिलेची निवड  title=

शनी शिंगणापूर : शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली.

अनिता शेटे आता अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झालीये..

महिलेचा शनी चौथ-यावरील प्रवेशानंतर पुजा-यांनी शनीच्या शीळेवर अभिषेक घातल्यानं राज्यभरातून मंदीर प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या विश्वस्तपदाच्या निवडणुकीत दोन महिलांनी अर्ज भरले होते.

यात प्रथमच महिलेची अध्यक्षपदी निवड झालीये. अध्यक्षपदच महिलेकडे आल्याने आता चौथ-यावर महिलांना प्रवेशाची मुभा देणारका याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..