पुणे : तळेगाव दाभाडे जवळच्या इंदोरीमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकारांने ग्रामस्थ संतप्त झालेत.
बुधवारी ही अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत असताना उमेश शिवा ठाकर नावाच्या एका युवकाने तिला खेळण्याच्या बहाण्याने घरात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
घाबरलेल्या स्थितीत मुलगी घराबाहेर रडत पडल्याचं तिच्या आईने पाहिले. तिची अवस्था पाहून झालेल्या प्रकाराचा अंदाज आल्यावर या घटनेची माहिती घरच्या मंडळींना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी उमेश शिवा ठाकरला अटक केली.
मुलीवर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, लोणावळ्यातल्या कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच, तळेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळं राज्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.