मुंबई : महाराष्ट्रात दीर्घकाळापर्यंत सत्ता उपभोगण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरात कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेतली. मुख्य म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही इथं जातीनं हजर झाले होते.
राज्यात शिवसेनेसोबत सत्तेचा घरोबा करत असलेल्या भाजपच्या मनात अजूनही एकहाती सत्ता न मिळाल्याची सल कायम आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील ज्या ६५ टक्के विधानसभा मतदारसंघात भाजप एकदाही निवडणूक लढलेली नाही, अशा ठिकाणी लक्ष केंद्रीत करा... या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करा… तेव्हाच भाजप महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता उपभोगू शकेल, असा कानमंत्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
नागपूरच्या 'रवि भवन' या शासकीय विश्रामगृहात अनेक भाजप कार्यकर्ते अमित शाह यांना भेटायला आले होते. शिवसेना लढत आलेल्या ६५ टक्के विधानसभा मतदारसंघात पक्षाला मजबूत केल्यानंतरच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारखीच एकहाती सत्ता भाजपला महाराष्ट्रातही मिळेल, असं शहा म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.