नागपुरात शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार

नागपुरात २१ वर्षाच्या शिक्षिकेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेच्या माहितीनुसार बलात्कार करणाऱ्यांपैकी दोघे जणं हे 20 ते 25 वयोगटातील, तर इतर तिघे हे 35 ते 40 वयोगटातील होते.

Updated: Dec 3, 2014, 12:00 AM IST
नागपुरात शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार title=

नागपूर : नागपुरात २१ वर्षाच्या शिक्षिकेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेच्या माहितीनुसार बलात्कार करणाऱ्यांपैकी दोघे जणं हे 20 ते 25 वयोगटातील, तर इतर तिघे हे 35 ते 40 वयोगटातील होते.

पीडित शिक्षिका काल संध्याकाळी मोटरसायकलनं आपल्या मित्रासह कळमना परिसरातल्या मंदिरात गेली होती. दर्शनानंतर दोघेही जबलपूर महामार्गावर फिरायला गेले.
 
यावेळी रस्त्यात भेटलेल्या पाचही जणांनी स्वतः पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर दमदाटी करत दोघांना निर्जनस्थळी नेण्यात आलं. 

काही अंतरावर गेल्यानंतर या पाचही जणांनी पीडितेसोबतच्या तरुणाला मारहाण करत पळवून लावलं. त्यानंतर हरिश्चंद्रवेढा या गावानजीक एका निर्जनस्थळी नेत या पाचही जणांनी बलात्कार केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.