अजब-गजब : मोबाईल अॅपवर 'भूत' घालतंय धुमाकूळ!

आज काल  स्मार्टफोनची संख्या फार कमी नाही आणि त्यावर आसलेल्या अॅप्लिकेशनही काही कमी नाहीत. यात काही गेमचे अॅप्लिकेशन (अॅप्स) आहेत तर काही सामाजिक बांधलकी जपणारी तर काही मनोरंजनात्मक... पण सध्या तरुणांच्या मोबाईलवर एक वेगळंच अॅप्लिकेशन धुमाकूळ घालतंय...

Updated: Jan 24, 2015, 08:07 PM IST
अजब-गजब : मोबाईल अॅपवर 'भूत' घालतंय धुमाकूळ! title=

पुणे : आज काल  स्मार्टफोनची संख्या फार कमी नाही आणि त्यावर आसलेल्या अॅप्लिकेशनही काही कमी नाहीत. यात काही गेमचे अॅप्लिकेशन (अॅप्स) आहेत तर काही सामाजिक बांधलकी जपणारी तर काही मनोरंजनात्मक... पण सध्या तरुणांच्या मोबाईलवर एक वेगळंच अॅप्लिकेशन धुमाकूळ घालतंय...

मोबाईलमधलं हे नवीन अॅप्लिकेशन पाहिलं तर आपल्याला असं वाटत असेल की त्यावर केवळ गेम सुरु आहे...  पण नाही... कारण, या अॅप्लिकेशनवर सुरु आहे 'भूत' शोधण्याचा कार्यक्रम... 

भूत... हा शब्द ऐकून  तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल... पण हे खरंय... सध्या अनेक तरुण मोबाईलवर हे अॅप्लिकेशन धुमाकूळ घालतंय. सध्या गमतीनं म्हणून जरी ही तरुण मुलं हे अॅप्लिकेशन हाताळत असले तरी हा चिंतेचा विषय बनू शकतो... हे अॅप्लिकेशन हजारो तरुणांच्या मोबाईलमध्ये असल्यानं यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जाऊ लागलंय. त्यामुळेच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हे अॅप बंद करावं, अशी मागणी केलीय. 

भूतासंदर्भात जागोजागी चर्चा होतात... त्यावर अनेक चित्रपटही तयार होतात... मात्र, भूत ही संकल्पनाच अस्तित्वात नसून तो मनुष्याचा मनाचा खेळ आहे. त्यामुळे असे अॅप्स वापरून नये, असा सल्ला मानसशास्त्रज्ञ  प्रो. एस. शिंदे देतात.

देव आहे की नाही.... भूत आहे की नाही... यावर वर्षानुवर्षे चर्चा होतात... त्यावर वादही होतात. मात्र, मोबाईलमधलं असं अॅप्लिकेशन सामाजिक आरोग्य धोक्यात टाकणारंच आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.