येवला : हौसेला मोल नसते. होऊ दे खर्च. अशी परिस्थिती राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. अनेक नेते आणि मंत्री प्रचंड पैसा पाण्यासारखा खर्च केल्याने चर्चेत राहिले आहेत. यात मंत्री भास्कर जाधव, सुनील तटकरे, लक्ष्मण जगताप, इद्रीस नाईकवाडी आदींची नावे चर्चेत राहिली. आता तर सोन्याचा शर्ट घालण्यारांच्या नावाची भर पडले.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पंकज पारख यांनीही सोन्याचा शर्ट तयार केला आहे. पारख यांनी जवळपास चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवला आहे. हा शर्ट परिधान करुन ते मिरवत आहेत. यामुळे ते ही गोल्डमॅन म्हणून ओळखले जात आहे.
दि्वंगत रमेश वांजले हे मनसेचे आमदार असताना अंगावर भरपूर सोने घालीत असल्याने त्यांची ओळख गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर पुण्यातील दत्ता फुगे यांनीही सोन्याचा शर्ट तयार केला होता. त्यांची पत्नी ही नगरसेविका होती. त्यामुळे ते ही राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याचे पुढे आले. हा सर्व त्यांचा खटाटोप हा हौसेसाठी होता, असे दिसते. त्यामुळे हौसेला मौल नाही, असेच दिसतेय.
येवला येथील कापड व्यापारी पंकज सुभाष पारख यांनी सोन्याचा शर्ट तयार केला आहे. लहानपणापासून सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्या पंकज पारख यांनी नाशिकच्या बाफणा ज्वेलर्सकडून हा शर्ट बनवून घेतला आहे. दुबई येथील एका कारागीराने या शर्टचे डिझाईन तयार केलंय. ६ जून २०१४ रोजी लग्नाच्या वाढ दिवस असल्याच्या निमित्ताने शर्ट बनवण्याची आयडीया त्यांना सुचली. तेव्हापासून १९ कारागीर शर्ट बनविण्यासाठी तयारीला लागले.
सोन्याचा शर्ट तयार करण्यासाठी ५० दिवस लागले. सोने फ्रेमचा चष्मा, सोन्याचे घड्याळ यासह पंकज यांच्याकडे हातात कडे, गळ्यात गोफ, अंगठी असे अंगावर दीड किलो सोन्याचे दागिने आहेत. ८ ऑगस्ट २०१४ रोजी ४५ व्या वाढदिवसानिमित्त हा शर्ट परिधान केला. मागील २३ वर्षांपासून नगरसेवक असलेले पंकज पारख आहेत. तसेच ८ वर्षापूर्वीं जनतेतून थेट नगराध्यक्षपदीही ते निवडून आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.