सातवा वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर

सातवा वेतन आयोग लवकरच आपला रिपोर्ट केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सोपवणार आहे. आयोगाशाची शिफारस लागू झाल्यानंतर जवळ-जवळ ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच ५५ लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे. आयोगाचा कार्यकाळ मागील महिन्यात वाढवण्यात आला होता. 

Updated: Sep 24, 2015, 11:33 AM IST
सातवा वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर title=

मुंबई : सातवा वेतन आयोग लवकरच आपला रिपोर्ट केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सोपवणार आहे. आयोगाशाची शिफारस लागू झाल्यानंतर जवळ-जवळ ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच ५५ लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे. आयोगाचा कार्यकाळ मागील महिन्यात वाढवण्यात आला होता. 

सुत्रांच्या माहितीनुसार, आयोगाचा रिपोर्ट जवळ-जवळ तयार आहे, हा लवकरच सरकारला सोपवण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी या जानेवारी २०१६ पासून लागू होतील. 

सरकार दहा वर्षानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करत असतं, तसेच काही संशोधनांसह या शिफारसी राज्यातील कर्मचाऱ्यांनाही लागू केल्या जातात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.