पुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 09:19 AM IST
पुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर  बहिष्कार  title=

पुणे : येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.  

जिल्ह्यातील एकूण २२ गावांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यातील १९ गावं पुणे शहरालगतची आहेत. शहरालगत असलेल्या या गावांनी महापालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी हा पवित्रा घेतला आहे.

या गावांनी उगारलेलं बहिष्कारास्त्र कामी आल्यामुळे राज्य सरकारवर ही गावं समाविष्ट करण्याबाबतचा दबाव वाढणार आहे. ही गावं महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्यानं त्याठिकाणी निवडणुका घेऊ नयेत, अशी या गावांची मागणी होती. 

मात्र एकदा जाहीर झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात येत नसल्यानं या गावांनी बहीष्काराचं हत्यार उपसले आहे. त्यात यश आल्यामुळे १५ गावांतील निवडणुका आपोआप रद्द होणार आहेत.