लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

Updated: May 18, 2017, 10:18 PM IST
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या  title=

नाशिक : ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

प्रशांत नामदेव खैरनार असं या मृत तरुणाचं नाव आहे. देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वाखारी) इथं ही घटना घडलीय. या घटनेमुळे दोन्ही लग्नघरावर शोककळा पसरलीय.

प्रशांत हा उच्चशिक्षित तरुण होता. त्यानं बी.ई. मेकॅनिकल पदवी मिळवेलेली होती. परंतु, त्यानं ही आत्महत्या का केली? यामागचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही.