कल्याण : राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी पांरपारिक पंद्धतीने मिरवणुकांचं आयोजन करुन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी मध्ये देखील नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. पुणेरी ढोल पथक, विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे विद्यार्थी, रथ, पांरपारिक वेशभूषा या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.
हिंदु सांस्कृती मंचातर्फे या मिरवणुकिचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध भाषेच्या, जातीच्या, संप्रदायाच्या लोकांचा सहभाग लक्षणीय होता. विविध पक्षाचे राजकारणी नेते या मंचातर्फे एकत्र येत या मिरवणुकीच्या आयोजनात सहभागी होत असतात.
पाणी वाचवा, बेटी बचाव यासारख्या सामाजिक गोष्टींचा देखील या मिरवणुकीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त उभारण्यात आलेला देखावा, विविध धर्मग्रंथांचा देखावा, लहान मुलांनी साकारलेले विविध महापुरुषांच्या वेषभूषा, जागोजागी काढण्यात आलेल्या रांगोळ्या, शिस्तबद्धता या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरली.
पाहा व्हिडिओ