रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट

हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Updated: Jan 12, 2016, 10:01 AM IST
रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट title=

नवी मुंबई : हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

रुळाला तडे गेल्याने  मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पनवेल आणि खांदेश्वर या स्थानकांदरम्यानच्या रुळाला तडे गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हार्बर रेल्वेमार्गावर ट्रेन्स उशीराने धावत आहेत. 

दरम्यान, लोकल वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.