ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचं निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि इतिहासकार निनाद बेडेकर यांचं पहाटे २.३०च्या सुमारास पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये निधन झालं. शिवचरित्राचे तसंच मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.

Updated: May 10, 2015, 03:06 PM IST
ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचं निधन  title=

पुणे: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि इतिहासकार निनाद बेडेकर यांचं पहाटे २.३०च्या सुमारास पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये निधन झालं. शिवचरित्राचे तसंच मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.

मोडी तसंच पर्शियन भाषेचाही त्यांचा अभ्यास होता... किल्ले भ्रमंतीचंही त्यांना वेड होतं. शिवचरित्रावर आतापर्यंत त्यांनी ५ हजारांहून अधिक व्याख्यानं दिली. संशोधन तसंच अभ्यासासाठी  त्यांनी जगभर भ्रमंती केली. 

वयाच्या ६१ व्या वर्षी १०१ किल्ल्यांवर भ्रमंती केली. व्यवसायानं  इंजीनियर असलेले बेडेकर किर्लोस्करमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निनाद बेडेकर यांचं संपूर्ण नाव निनाद गंगाधर बेडेकर असून १७ ऑगस्ट १९४९ ला त्यांचा जन्म झाला. 

निनाद बेडेकर यांची ग्रंथसंपदा -

  • विजयदुर्गाचे रहस्य
  • |शिवभूषण|
  • गजकथा
  • छत्रपती शिवाजी
  • अजरामर उद्गार
  • झंझावात
  • थोरलं राजं सांगून गेलं
  • समरांगण

पाहा निनाद बेडेकर यांचा 'हार्ट टू हार्ट' हा कार्यक्रम...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.