पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Updated: Sep 26, 2015, 08:32 AM IST
पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन title=

पुणे : पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

अधिक वाचा : 'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...

 पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या साक्षीने हा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग मंडळ, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा मंडळ या पाच मानाच्या गणपतींबरोबरच दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट व मंडई मंडळ ‘श्रीं’च्या मूर्तींचे हौदात विसर्जन करणार आहे. 

पाहा : बाप्पा तुमच्या डेस्कटॉपवर

राज्यात यावर्षी चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. तसचे यावर्षी तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.