शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत सोमवारी मोठा अनर्थ होता होता टळला. साईबाबा हॉस्पिटल मधील OPD मध्ये हजारो रुग्ण तसेच नातेवाईक नेहमीप्रमाणं होते.
दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक हॉस्पिटलच्या छताच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळायला सुरूवात झाली. त्यामुळं रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरु झाली.
सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही.... काही वर्षांपूर्वीच साई संस्थानच्या या हॉस्पिटलचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. छताचं स्लॅब कोसळल्यानं रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तूर्तास तात्पुरती डागडुजी करण्याचं काम सुरू झालंय.