नाशिक : आणखी किती मुलींचं केलंय शोषण?

नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आलीय. 

Updated: Dec 6, 2016, 08:10 PM IST
नाशिक : आणखी किती मुलींचं केलंय शोषण? title=

नाशिक : नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आलीय. 

पीडित मुलीवर तिच्याच शाळेत शिकणा-या सहा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. 

ती मुलं पीडित मुलीला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती शाळेतल्या शिक्षकांना आणि प्राचार्यांना होती. मात्र शाळा व्यवस्थापनानं योग्यवेळी कारवाई केली नाही, असा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. 

या शाळेत इतरही अनेक मुलींबाबत असे प्रकार घडल्याची स्फोटक माहितीही त्यांनी दिलीय.