पुण्यात तिकीटांसाठी आमरण उपोषण सुरू

पुण्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी गांधीगिरी करत पक्ष कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत उपोषणाला बसले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2017, 08:30 PM IST
पुण्यात तिकीटांसाठी आमरण उपोषण सुरू title=

पुणे : ठाणे आणि नाशिकमध्ये भाजपमधील नाराजांचा राडा सुरु असताना तिकडे पुण्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी गांधीगिरी करत पक्ष कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत उपोषणाला बसले. 

कोथरुड प्रभागातील कार्यकर्ते असलेले जगन्नाथ कुलकर्णी तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांना तिकीट देण्याचं आश्वासनंही नेत्यांनी दिलं होतं. पण भाजपमधील निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचा आरोप करत त्यांनी निषेध नोंदवला.  

कुलकर्णींच्या या गांधीगिरीला साथ देत इतर प्रभागातील नाराजही या आंदोलनात सहभागी झाले होते.