पत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं

सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.

Updated: Oct 13, 2015, 01:23 PM IST
पत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं title=

श्रीकांत राऊत, यवतमाळ : सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.

यवतमाळ जिल्ह्यातील कारखेडा गावातील  दत्तराव कदम. त्यांचे गेल्या तीन वर्षांपासून राबराब राबूनही शेतात पीक काही आले नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर. यंदा चार एकर शेतात सोयाबीन आणि तूर पेरलं. मात्र पावसाअभावी सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. पीक वाया गेलं त्यामुळं दत्तरावांनी उभ्या पिकांत गुरंढोरं चरण्यासाठी सोडली.

पुढं काय या विचाराने दत्तराव निराश झाले. हताश अंतःकरणानं झाडावर चढून गळफास बांधला. ते झाडावर लटकणार तेवढ्यात दत्तराव यांची पत्नी संगीता भाकरी घेऊन शेतात दाखल झाल्या. पतीचा शोध घेत त्या झाडाजवळ पोहचल्या. पती गळफास लावत असल्याचं पाहून तिनं हंबरडाच फोडला.

धनी निराश होऊ नका. हरुन जाऊ नका, मुलांकडे पाहा, खचू नका, धीर धरा. आम्हाला उघड्यावर सोडून जाऊ नका. जास्त मेहनत करु पण असा काही करु नका. हा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी तिथं जमले. संगीताबाईंची ती साद दत्तरावलाही जगण्याची नवी उमेद देऊन गेला. 

गावकरी आणि पोलीसपाटील यांच्यासह तहसीलदार सचिन शेजाळ माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. दत्तराव कदम आस्थेने चौकशी करत त्याला हवी ती मदत देण्याची ग्वाही दिली. पतीसह शेतात काबाडकष्ट करणाऱ्या संगीतानं पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं. या आधुनिक सावित्रीच्या मदतीला गावकरी आणि प्रशासन धावून आल्यानं एका शेतक-याचा जीव वाचलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.