पुणे : आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.
पत्नी जीन्स घालत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह घरात टाकून पतीने पोबारा केला. ही घटना पुण्यातील इंदिरानगरमध्ये घडली.
पूजा आणि रणजीत निषाद हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. हे दाम्पत्य मुळचे उत्तरप्रदेशचे आहे. पूजा नेहमी जीन्स-टी शर्ट घालत असे. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. मंगळवारी रणजित आणि पूजामध्ये वाद झाला होता. वादाच्या वेळीची पूजाने जीन्स-टी शर्ट घातले होते, अशी माहिती पुढे आलेय.
रणजित बुधवारी सकाळी घरातून जात असताना स्थानिकांनी बघितले होते. यानंतर निषाद दाम्पत्याचे घर बंदच होते. दरम्यान, तीन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी आल्याने स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ज्यावेळी घर उघडले त्यावेळी घरात पूजाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पूजाचा पती रणजीत फरार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.