मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आयटम साँगवर थिरकल्या तरुणी

एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कोणी काय करेल ते सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये पाहायला मिळाला. 

Updated: Jan 12, 2016, 11:49 AM IST
 मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आयटम साँगवर थिरकल्या तरुणी title=

नांदेड : एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कोणी काय करेल ते सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये पाहायला मिळाला. 

नांदेडच्या माळेगावात एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. या कार्यक्रमाला लोकांची गर्दी व्हावी म्हणून चक्क काही तरुणी तोकड्या कपड्यात आयटम साँगवर तरुणी थिरकल्या. 

मेळागावात भरलेल्या यात्रेत खंडोबाच्या दर्शनासाठी तसेच धनगर मेळाव्यादरम्यान भाषणासाठी फडणवीस तेथे उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम म्हणजे तेथे भरगच्च गर्दी हवी. यासाठी बोलवण्यात आलेल्या कलापथकाने 

चक्क मराठी, हिंदी गाण्यांवर आयटम डान्सचा कार्यक्रम ठेवला. बराच वेळा हा प्रकार सुरु होता.