सांगली : सांगली येथील सर्वोदय विध्यालायाच्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या शुभम गोरे या विध्यार्थ्याने सडक्या केळापासून इथेनॉल निर्मिती केली आहे.
हे इथेनॉल अत्यंत शुद्ध स्वरूपातील असल्याने दुचाकी मोटार सायकल १००% इथेनॉलवर चालवून त्याने दाखवली आहे. इतकेच नव्हे तर या इंधनाची पियुसी टेस्ट घेतली असता पेट्रोलच्या तुलनेत ०.०३४ पी.पी.एम इतका कार्बन मोनॉक्साईड यातून बाहेर पडत असल्याने पर्यावरण प्रदूषण धोका संपूर्णपणे नाहीसा होत असल्याचा दावाही त्याच्या शिक्षकांनी केला आहे.
शिवाय हे जैव इंधन वापरताना गाडीच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल न करता १००% इथेनॉल वापरता येते हे शुभमने सिद्ध केले आहे. शुभमच्या प्रोजेक्टला जिल्हास्थरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात आणि नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळला आहे. आत्ता डिसेंबर मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तो आपला प्रोजेक्ट सादर करणार आहे.
कशी मिळाली प्रेरणा?
सांगली येथील सर्वोदय विद्यालयामध्ये शुभम प्रकाश गोरे हा विध्यार्थी इयत्ता नववी अ मध्ये शिकत आहे. एकदा साखर कारखान्याच्या सहलीला गेला असता त्याने मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रकल्प बघितला. तेव्हापासून जैव इंधन निर्मितीच्या पर्योग करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. याच दरम्यान त्याच्या विज्ञान शिशिका सौ. जयश्री पाटील यांनी त्याला इन्स्पायर अवार्ड या विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. आणि त्यासाठी त्याला प्रोजेक्ट बनवण्या विषयी सुचवले.
शुभमने पाटीलने मॅडमना इथेनॉल कोण कोणत्या पदार्थापासून बनवता येते याची माहिती विचारली. त्यांनी त्याला गोड फळे, गुल्कोज असणारे पदार्थ यापासून इथेनॉल बनवता येते हे सांगितल्यावर दोघांनी केळी या नाशवंत स्वस्त फळावर प्रयोग करून इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. शुभमने जास्त पिकलेली, काळी झालेली केळी २ महिने यीस्ट पावडर घालवून आंबवली. त्यानंतर त्यात पुरेसे पाणी घालून हे मिश्रण ७८ सेंटीग्रेट इतक्या तपमानापर्यंत उकळवले. नंतर उर्ध्वपातन प्रकियेद्वारे त्यातून निघणारी वाफ साठवून, ती थंड झाल्यावर त्याचे इथेनॉलमध्ये रुपांतर केले.
कसा केला प्रयोग
या इथेनॉलमध्ये कॅल्शिअम कार्बाईड मिसळले असता असिटीलीन वायू निर्माण होते. जो ज्वलनशील आहे हे त्याच्या लक्षात आले. हाच वायू थंड करून त्याचे जैव इंधन त्याने बनवले आणि त्याद्वारे मोटार सायकल चालते का ते पाहिले. मोटारसायकल अत्यंत उत्कृष्टपणे तर चाललीच पण या इंधनाच्या वापरामुळे धूर अत्यंत कमी बाहेर पडत असल्याचेही त्याला जाणवले. नंतर त्याने शुभमने आणि त्याच्या विज्ञान विषय शिक्षिका सौ. जयश्री पाटील यांनी क्वॉलिटी अॅनालॅटीकल या लॅबला नमुनाही पाठवला.
तेथून ते पेट्रोलच्या गुणांशी साधर्म्य असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण एक शुद्ध स्वरुपाचे जैव इंधन निर्मिती केली असल्याचे शुभमच्या लक्षात आले आणि त्याने इन्स्पायर अॅवार्डला आपला प्रोजेक्ट सादर केला.
शुभमच्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक
जिल्हास्थरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये शुभमच्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला असून अत्यंत स्वस्त प्रदूषण मुक्त असे हे जैव इंधनाचा प्रोजेक्ट पुढे राज्यस्तरावर नागपूर येथे पाठवण्यात आला आहे. तेथेही शुभमच्या प्रयोगाला दाद मिळाली व प्रथम क्रमांक मिळवून तो दिल्लीच्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये डिसेंबर मध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शुभमच्या विज्ञान शिक्षिका जयश्री पाटील यांनी दिली.
या जैव इंधनावर मोटार सायकल चालवून ती कशी चांगल्या पद्धतीने चालत आहे याची ही याचवेळी महेश पाटील यांनी चाचणी घेतली. तेव्हा त्याच्याही लक्षात आले की, गाडीच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल न करता १००% या इथेनॉलवर कोणतेही दुचाकी, चार चाकी व्यवस्थितपणे चालू शकते, असा दावा करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.